ढोल वाजतो नाचता नाचता

 ढोल वाजतो,बिरी सूर धरते
तुर खुलतो आणि 
मुली गाणी म्हणतात
आर्धी राते रा भाया
ढोल वाजेडे नेरा ..
आर्घी राते वा सुमन
नाचा निंगली नेवा ...
नाचून पडते
नाचून नाचून कर्तलाची रात
उलटून जाते नाचून रात जिंकायची असते सकाळ होते अन विधिवत
प्रधान पुढे,ढोल मागे नाचत- नाचत
मांडव घ्यायला निघतात
वाजत गाजत मांडव आणतात
लग्नाचा मांडव सजवतात-
नियी मांडवणी,नियी तोरणी
पड गई, घरी सायाय्य

Comments